STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

प्रेमाची भेट

प्रेमाची भेट

1 min
204

पहिल्या प्रेमाची भेट म्हणून 

मी माझ्या पसंतीची साडी तुला दिली

किती अलगदपणे तू साडीला

 ह्रुदयाशी धरले

जणूकाही माझ्या प्रेमाचे रंग

 त्यात भरले 


त्यानंतर प्रत्येक भेटीला

तू धावत पळत यायची

कितीदा डोळ्यात भरून घ्यायची

त्या भेटीत आपण सुख दुःख 

वाटून घ्यायचो

तुझ्या माझ्या आवडीची भेट देताना

एकमेकांना एकमेकांमधे 

कितीदा बघायचो


त्या भेटण्याच्या आनंदाला

काहीच मर्यादा नव्हती

वेळेला मात्र हरकत होती

एकमेकांच्या सहवासात

आपण हरवून जायचो

नजरेआड होताना

मागे वळून बघायचो


पण एकदिवस अचानक

मी दिलेल्या भेटी

तू परत करून गेलीस

काहीन सांगता कायमची 

वेगळी झालीस 

तू असं करशील

असे कधी वाटले नाही

तुझे असे वागणे 

जराही पटले नाही

खर सांगू का तू गेल्यानंतर 

मी तुलाचं आठवत होतो

त्या भेटींच्या गर्दीत

मी दिलेली साडी शोधत होतो


तू सगळ्या भेटी दिल्यास

पण साडी मात्र दिली नाहीस

तेव्हाच कळले

तुझ्या अशा वागण्यात

काहीच तथ्य नव्हते

कुठेतरी प्रेम शिल्लक होते.


पण तू अशी वृद्धश्रामत

भेटशीलं 

असा कधी विचार केला नव्हता

तुझ्या कपाळावर कुंकू मात्र 

ठळकं दिसत होता

तुझ्या गळ्यातल्या मंगळसुत्रमुळे

तुझ्यामाझ्या प्रेमाचा 

संदर्भच बदलला

तुला पाहिल्यावर 

पहिल्या भेटीचा 

दिवस आठवला


काय हा नियतीचा खेळ

तू दुसऱ्याची झाल्यावरही  

वृद्धश्रामचा आधार घेतलास  

मी तुझ्या आठवणीत 

एकटाच राहीलो म्हणून 

वृद्धश्रामाने मला आधार दिला

पण मी दिलेली साडी

तुझ्या अंगावर पाहील्याने

माझे आयुष्यच वाढले

अजुनही मी दिलेली साडी 

तू जपून ठेवलीस ना!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance