माणूस मेल्यानंतर
माणूस मेल्यानंतर
बाळ जन्माला येण्यासाठी
नऊ महिने वाट पहावी लागते
माणूस मेल्यावर त्याला
घेऊन जाण्याची घाई होत असते
नात्यागोत्यातील माणसं येईपर्यंत
किती वाट पहात बसतात
सारे गणगोत आल्यावर
प्रेत बाहेर काठा म्हणतात
काय कमाल म्हणावी ना
माणूस संपल्यावर त्याचं
प्रेत होऊन जात असत
त्या निर्जीव देहाचं त्यावेळी
काहीच अस्तित्व नसतं
रडून रडून त्याला तरी
कितीदा कवटाळत असतात
जाता जाता त्याला अखेरचं
डोळे भरून पाहत असतात
त्यांच्या अंत्यविधीची त्यावेळी
सर्वांची धावपळ होत असते
दिड मिटर कपड्याशिवाय
अंगावर त्यांच्या काहीच नसते
तिरडीवर लेटवताना
अंगावर काहीच राहू देत नाही
नावा शिवाय सोबत त्याच
्या
काहीच जात नाही
स्मशानात घेऊन जाताना त्याचा
जन्म मृत्यू पर्यंतचा प्रवास आठवतो
आठवता आठवतात सरणावरती
देह त्याचा जळत असतो
श्रध्दांजली देताना सर्वांकडून
त्याचं दुःख व्यक्त होत असतं
मात्र त्यानंतर कोणालाही
त्याचं जाण्याचं सोयरसुतक नसतं
खरचं....
कुटुंबासाठी झिजणाऱ्या माणसाची
राख सुध्दा राहू देत नाही
अखेरचा निरोप देताना
मागे वळून कोणी पहातही नाही
क्षणात त्याच्या कर्तव्याची
राख होऊन जात असते
माणूस मेल्यानंतर त्याच्या
कर्तृत्वाला काहीच किंमत नसते
जिवंतपणी तर त्याचा सर्वांकडून
सन्मान होत असतो
त्यानेच उभं केलेल्या घरात
मेल्यानंतर भिंतीवर फक्त त्याचा
फोटोच दिसतो.