आई
आई
आई तू किती जीव लावतेस
तरी तुझं प्रेम कमी होत नाही
तू डोक्यावरून हात फिरवल्याशिवाय
माझं मन भरत नाही
आई तुला पाहिल्यावरच
माझा दिवस सुरू होतो
तुझ्या पायाखालची माती
मी माझ्या कपाळी लावतो
आई तुझ्या डोक्यावरचा पदर
माझ्या डोक्यावर छाया
तुझ्या ममतेत आहे गं
जशी यशोदेची माया
आई तुझ्या मांडीवर डोकं ठेवून
मी किती लाडात येतो
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद
मी डोळेभरून पहातो
आई तू आयुष्यभर प्रेम करते
तरी तुझं प्रेम सरत नाही
तुझ्याशिवाय आई
घराला घरपण येत नाही
तुझ्या पायावर डोकं ठेवून
माझं आयुष्य वाढून जाते
तुला पाहिल्यावर आई मला
देव भेटल्या सारखे वाटते
तू नसल्यावर आई
जराही करमत नाही
तुझ्याशिवाय अंगाई
कोणालाच गाता येत नाही
