STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Classics

4  

Sanjay Dhangawhal

Classics

पाऊस आणि तुझं नातं

पाऊस आणि तुझं नातं

1 min
26

पाऊस आणि तुझ नातं

 जरा जास्तच घट्ट आहे

 म्हणून......

 तुझ्या मर्जीने तो येतो

 बिनधास्तपणे तुझ्यासोबत खेळतो

मग तू ही मनसोक्त भिजते

 बेधुंद होऊन पावसाला मिठीत घेते

 

तुला भिजलेलं पाहून पाऊस

जरा जास्तच लाडावतो

 म्हणून......

 तुझ्यासाठी किती सरी धावून येतात

 तुझ्या भोवती पिंगा घालतात

 मग तू पावसाच्या नादात हरवून जाते

 थेंब थेंब पाऊस ओंजळीत भरते


 कधी कधी पाऊस हळवा होतो

कधी कधी मनमोकळा होऊन वाहतो

 म्हणून.......

 गरमागरम भजीचा मोह आवरत नाही

 पावसात भिजल्याशिवाय

 पाऊसही कळत नाही

मग गोड गुलाबी गारवा पांघरूण घेतांना

 वाफळलेली चहाची फुर्की मारतो

 रूप तुझं भिजलेलं डोळेभरून पाहतो


 वारा तुला छेडताना

 तू जास्तच सुंदर दिसतेस

 म्हणून.....

पाऊस जराही थांबत नाही

 तुझ्याशिवाय त्यालाही करमत नाही

 मग तुझ्या गालावरची खळी पाहून

 मोर थुईथुई नाचायला लागतो

 रूप देखणं पाहून

 बहर फुलांचा बावरा होतो


 *संजय धनगव्हाळ*

 *(अर्थात कुसुमाई)*

 ९४२२८९२६१८

९५७९११३५४७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics