गुरूदत्ता
गुरूदत्ता


काय गाणं लिहू मी तुझ्या साठी गुरुदत्ता,
की शब्दातीत अशी आहे तुझी सुंदरता,
तुझ्या दारी जेव्हा दिसते तुझी प्रसन्न मूर्ती,
मनात माझ्या उमलते एक नविन स्फूर्ती,
तुझ्यापासूनच तर सुरू होते हे आभाळ, हा समुद्र,
श्वेत रंगापेक्षा शुद्ध, निर्मळ असे तुझे चरित्र,
ह्या अखंड विश्वाचा तू एकमेव परमात्मा,
ह्या देहामधील तूच तर आहेस खरा आत्मा,
सूर्याहूनी तेजस्वी असे तुझे नेत्र,
ब्रम्हा, विष्णु, महेश, ह्यांचे तू एक चित्र,
तसे तर तू दिलेस गुरुदत्ता मला सगळं काही,
r: rgb(0, 0, 0); background-color: transparent;">याहून चांगलं आयुष्य तर कोणी मागू शकत नाही,
पण तरीही माणसासारखी एक माणूस आहे मी,
आहेत माझ्यात दोष, आहे माझ्यातही काही कमी,
त्या दोषांवरच मात करण्यासाठी मागते शक्ती तुझ्याकडे,
ज्यामुळे हे आयुष्य होईल अजुन चांगलं इथुन पुढे,
करून घे माझ्या हातून लोकांसाठी काही कार्य चांगले,
जणु तुझाच एक अंश जागृत व्हावा माझ्यामध्ये,
सदा राहील मला ओढ तुझे दर्शन घेण्याची,
कदाचित तुला पाहुनच दिसते दिशा ह्या जीवनाची,
कोटी तुझ्या भक्तांमध्येच मी आहे अशी एक सामान्य,
तुझ्या चरणी माथा टेकूनी होते मी खरी धन्य!