परमेश्वरा तुझी आभारी
परमेश्वरा तुझी आभारी
दुखावले मन कुणी आपल्यानी जेव्हा,
अश्रू घेऊनी आले तुझ्या दारी,
मग दिसले एक वृद्ध आजी-आजोबांच्या डोळ्यातले दु:ख,
त्यापुढे नव्हते माझे दु:ख काही,
मग पाहता तुला परमेश्वरा, झाले मी तुझी आभारी,
लागुनी ठेच पायाला झाल्या वेदना कित्येक दिवस,
मीच का, हे विचारले जेव्हा आले तुझ्या दारी,
मग काठीच्या आधाराने रसत्यावर चालणारा दिसला एक अपंग,
त्यापुढे नव्हत्या माझ्या वेदना काही,
मग पाहता तुला परमेश्वरा, झाले मी तुझी आभारी,
जीवनाच्या लढ्याला कंटाळून एक दिवस,
तक्रार घेऊनी आले तुझ्या दारी,
मग प्रखर उन्हात पोटासाठी राबणारा दिसला एक मजूर,
त्याचापेक्षा आपला लढा आहे सोपा खरोखरी,
मग पाहता तुला परमेश्वरा, झाले मी तुझी आभारी,
दिलेस एवढे चांगले आई-वडील मला घडवीण्यासाठी,
दिलेस दोन डोळे हे सुंदर जग पाहण्यासाठी,
दिलेस दोन कान मधुर संगीत ऐकण्यासाठी,
दिलीस ही बुध्धी अन् क्षमता हे शब्द लिहीण्यासाठी,
ही सर्व आहे खरी तुझीच कृपा सारी,
त्यासाठी परमेश्वरा, आहे मी तुझी आभारी,
दिलास तू मला इतका चांगला जन्म,
दिलीस त्यात मला अशीही शक्ती,
की ज्यांच्या आयुष्यात नाही इतके भाग्य,
आणू शकेन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे दोन क्षण सोनेरी,
त्यासाठी परमेश्वरा, आहे मी तुझी आभारी,
घेउनी मनात माझ्या आशा अन् अकांक्षा,
येते मी तुझ्या दारी,
कधी तू गणराया,कधी तू गुरूदत्ता,कधी तू जोगेश्वरी,
पाहता तुझे सुंदर रूप भरुनी जाते मन क्षणात,
मग टेकूनी तुझ्या पायाशी माथा अखेरी,
हे परमेश्वरा, होते मी तुझी आभारी !
