चांदण्या
चांदण्या
1 min
714
रात्रीच्या ह्या चांदण्या,
किती सुंदर दिसतात,
सूर्य मावळल्या नंतर गगनात,
चमचमणारी मेहफिल जमवतात,
सुख दुखांच्या पलीकडे जणू,
आनंदाने लुकलुकत असतात,
आभाळच त्यांचं जग असतं ज्याला,
आपल्या अस्तित्वानेच सुंदर करतात,
समुद्रात आपले प्रतिबिंब पाहता,
आपापसात गप्पागोष्टी करतात,
ढगावर ऐटीत बसलेल्या चंद्राची,
जणू मस्करी करत असतात,
कधीतरी गच्चीत, असीम आकाशाखाली,
रात्रभर ह्या चांदण्याना पाहात राहवेसे वाटते,
मग आठवणींचा एक खजीना होऊन,
ते चांदणे मनामध्ये साठते,
हृदयाजवळची माणसं जी कधी,
खूप लांब गेलेली असतात,
अचानक आठवणींच्या आभाळावर,
ते तेजस्वी तारे होऊन चमकतात.
