STORYMIRROR

Aditi Bapat

Abstract

3  

Aditi Bapat

Abstract

मराठी भाषेला समर्पित कविता

मराठी भाषेला समर्पित कविता

2 mins
1.0K

मायेच्या पहिल्या हाकेचं मराठी,

कधी न सुटणाऱ्या ह्या मातीशी तुझ्या गाठी,


आजन्म लढले शिवराया ज्याच्या मानासाठी,

पेशव्यांच्या हर हर माहादेवातलं मराठी,


डोलते इथे मराठी शेतकऱ्यांच्या गाण्यात,

गोडवा ह्या मराठीचा इथल्या पावसाच्या पाण्यात,


लिहिली ज्या भाषेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी

गणरायांची स्तुती ह्या भाषेत होते घरोघरी,


गंध मराठीचा इथल्या प्रत्येक पानात व् फुलात,

अन् सूर्यप्रकाशाच्या प्रत्येक किरणात


आहे अशी सर्वश्रेष्ठ ही मराठी,

भगव्या ध्वजाला उंच धरणारी ती काठी,


मग का विसरत चालला आहेस तुझी ही मातृभाषा आज,

कशाला वाटते तुला त्याची लाज ?


बोल तुझ्या ह्या मातृभाषेत ठेवून ताठ मान,

असूदेत ह्रुदयात तुझ्या कायम त्याचा सम्मान,


कायम ठेव राज्य मराठीचं इथल्या प्रत्येक कणावर,

आणी इथे घडणाऱ्या प्रत्येक क्षणावर,


नको सहन करुस कधीच तुझ्या मराठीचा अपमान,

कारण ही तुझी मायबोलीच आहे तुझा स्वाभिमान !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract