STORYMIRROR

Malati Semale

Abstract

4  

Malati Semale

Abstract

माझी आई

माझी आई

1 min
41.7K


ईश्वरासम पुज्य मनमंदिरी,

प्रेमळ मूर्ती माझ्या आईची.

घडविले उदरात आपुल्या,

आकृती रचून रक्तथेंबाची .


लळीवार शिशूस पाजी मुखी,

अमृताहूनी गोड धार दुधाची.

युगे भासे तृप्ती डोळा,

छाया सदा वरद हस्ताची.


बळ पेशींना जगण्यास देई,

थोर योगीताचे ज्ञानसागर.

लाभे सात जन्माची पुण्याई,

आजन्म न फिटे ऋणभार.


सागराहूनही विशाल माया,

मांडी अनमोल बिछान्याहूनी.

कर तीचे मऊमऊ स्पर्शातले,

निद्राधीन जावे सदैव नयनी.


अमुल्य खाण सुसंस्काराची,

जगी नसे कोण तुजसमान.

जिव्हाळा अफाट शब्दगंधात,

स्फुुरण चढे होण्यास गतीमान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract