STORYMIRROR

Trupti Naware

Abstract

3  

Trupti Naware

Abstract

कशी असावी कवीता

कशी असावी कवीता

1 min
14.5K


कवीता असावी

कवेत घेण्यासारखी

बिलगून घट्ट मनाला

तिच्या खांद्यावर ..रडता येण्यासारखी

तिला कळावे उसासे शब्दांचे

शब्दगर्भातल्या वाफेचे

तिने हळुच फुंकर घालावी

यातनेला साद देण्यासारखी...

कवीता असावी

साधी सरळ

सुर्यकिरणांसारखी प्रखर तेजस्वी

तरी सौम्य

कोवळ्या कळीलाही

क्षणात उमलवण्यासारखी...

तिला स्पर्शावे अर्थबोध

हृदयाच्या आतल्या कप्प्याचे

तिने करावे धाडस

न लाजता सांगण्याचे

मग हसावी गालात

नटलेल्या नववधुसारखी...

कवीता असावी

विरह मिलनासारखी

सुखदुःखाच्या अश्रुत भिजून

इतरांना शहारा देण्यासारखी....

तिने जपावे भाव

अबोल भाषेचे..नि

प्रत्येक शब्दातून

प्रत्येकाशी बोलणारी

तिच्यात असावी प्रतिभा

मनामनाला भिडण्यासारखी...

कवीता असावी

राजाराणीच्या सिंहासनासारखी

राजा असो,नसो वा रानी रुसो

तरी सिंहासनास प्रत्येकाने

झुकून सलाम करण्यासारखी...

तिने करावे घर

प्रत्येक रसीक मनात असे की

मिळेल दाद भरभरून

शेवटच्या ओळीसरशी

अशी सोबत करावी तिने

आयुष्याला पुरण्यासारखी...

अशी असावी कवीता

कवेत घेण्यासारखी..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract