STORYMIRROR

Vinay Dandale

Abstract

4  

Vinay Dandale

Abstract

साद अंतर्मनातील ....!

साद अंतर्मनातील ....!

1 min
385

  वेळी अवेळी 

   खिन्न अवस्थेत तुम्ही 

   अंतर्नादाला दिलेली आर्त हाक 

   आणि हाकेला साद येईपर्यंत 

   पाहिलेली काळहीन वाट 

   अनुभूती घेतलीय का कधी 

   या दोहोंमधील 

   सहनशील क्षणांच्या काहिलीची ....!


   पुन्हा पुन्हा हाक देऊन 

   कोरडा पडलेल्या घशाला 

   आणि थरथरणाऱ्या तनाला 

   जेव्हा कुठलाच मिळत नाही 

   प्रतिसाद अंतर्मनातून ,,,,

   तेव्हा मात्र , 

   गात्र न गात्र सक्रिय होतात 

   आणि , आकांडतांडव करतात 

   आक्रस्ताळेपणाने ....!


   गात्रांचा आकांडतांडव बनतो 

   एक लयबद्ध मेलोड्रामा 

   तरीही नाही येत आतून 

   कोणताच प्रतिसाद ,,,, 

   आणि अंदाजही नाही लागत 

   कुठल्याही परिस्थितीचा , प्रतिसादाचा ,

   तेव्हा मात्र 

   तन आणि मन 

   घायाळ होऊन हार पत्करतात 

   आणि , थकून जातात की ,

   अजूनही नाही मिळाला प्रतिसाद ....! 


   हाक मारून घायाळ झालेलं मन 

   आणि चेहऱ्यावरील उदासी ,,,

   त्या कठीणसमयीही 

   प्रतिसाद न मिळाल्याच्या तक्रारीवर 

   नियंत्रणासाठी ठेवतो 

   ताबा आणि विश्वास , 

   आपल्या ऐकू न गेलेल्या हाकेवर 

   आणि 

   प्रतिसाद न देणाऱ्या अंतर्मनावर ....!


   युगानुयुगे भासणाऱ्या त्या क्षणी 

   मनात उठलेल्या

   अगणित मूकबधिर शंकाचे थैमान

   क्षणात दूर होतात ,,,,,

   जेव्हा अंतर्मनातून येते साद 

   अन मोकळे होते गात्र न गात्र ,

   आणि नकळत लालीमा पसरते चेहऱ्यावर 

   प्रातःकाळच्या गुलाबी किरणासारखी ....!!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract