STORYMIRROR

Vinay Dandale

Tragedy

3  

Vinay Dandale

Tragedy

आठवण

आठवण

1 min
272

आज गच्च भरलं आभाळ पाहून,

बापाची याद दाटून आली

किती आवरलं मनाला तरी,

कपारीतून पाणी झिरपलं गाली


गच्च भरलं आभाळ पाहिलं की, 

बाप माझा हरखून जायचा

औत - तिफन - डवरे - वखर, 

सारं सारं जमवून ठेवायचा


सर्ज्या - राजाच्या जोडीसंगे, 

सारं सारं वावर पेरायचा

बेभरवशाच्या पावसाची, 

आतुरतेनी वाट पाहायचा


पैशाचा सारा जुगाड जमवून, 

आनंदाने पेरणी करायचा

आज येईल उद्या येईल म्हणत,

पाऊस हुलकावणी द्यायचा


आज मशागत पेरणीही आटोपली,

आभाळही गच्च भरलेलं आहे

पाऊसही बरसायला लागलाय,

साधलेली पेरणी बघायला बाप नाही आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy