शोध ....!
शोध ....!
1 min
156
भारत माझा देश आहे ....!
लहानपणी शाळेत ही प्रतिज्ञा म्हणतांना
घश्याला कोरड पडायची ....
प्रभात फेरीत
भारत माता की जय ,,,,
म्हणत, पाय दुखेस्तोवर फिरायचो ,
मग, हातात मिळणारी
पारले जी ची दोन बिस्किटे पाहून
आनंद व्हायचा ,
छाती गर्वाने फुगायची ,
देश - देशाभिमान तनामनात जागायचा
पुढे
जसा जसा मोठा झालो ,
माझा भारत देश मी शोधू लागलो ,
स्वातंत्र्यानंतरचा राज्यघटनेतला
भारत देश
कधी सापडेल बरं , मला ....????
