प्रतिक्षा ....!
प्रतिक्षा ....!
1 min
259
नवाकोरा कॅनव्हास समोर ठेवून
पुन्हा पुन्हा पेन्सिल हाताशी खेळवत
शून्यात बघणारा मी
अस्वस्थ... बेचैन होतोय...
ती पाठमोरी
ओलेत्या अंगाने
लांबसडक केसांना सुकविते
तिचं एक सुंदरसं
रेखाटायचंय मला
पण काढायचं कसं
या संभ्रमावस्थेत
मी नजरेचं आकाश पसरवून
बसलोय
चंद्राचा चेहरा दिसावा
या प्रतिक्षेत ....!!!!
