देहाक्षरं..!
देहाक्षरं..!
आपण वाटा मुकेपणाच्या चालताना
मी तुला दिलेली डायरी आहे नां
ती कोरी नको ठेवूस .
कधीतरी तुझ्या मनावर
वेदना - संवेदनाच्या गोंदणवेणाची
अक्षरं उमटतील
आणि तू ग्रीष्मपर्वातही
सावलीचं सुख अनुभवशील तेव्हा
तुझ्या मनाच्या कोऱ्या पानावर
हे सारं
आपल्या प्रेमाच्या शाईनं लिहून टाकशील
मग तूच बघशील
तुला तुझीच देहाक्षरं सापडतील
त्या प्रत्येक शब्दांत ,
...माझं आणि माझ्या कवितेचं
प्रतिबिंब ही असेल
त्या अक्षरा - अक्षरांत..!

