वास्तव
वास्तव
1 min
190
आता मौनसुद्धा
आकांडतांडव करायला लागतंय
मौनाच्या या कोलाहल वजा दंगलीत
सर्वच भरडू लागलेत
बुद्धिवादी, तत्ववादी आणि वगैरे वगैरे
खरं तर
मौनातच तृप्त असणारं मन
पण त्या मनातच काहूर माजतंय
मौनाच्या वेदना
इंद्रायणीच्या महापूरासम
अंगावर कोसळत जातात
अपूर्णतेचं वास्तव
असहाय्य करत जातेय मौनाला
आकांडतांडव करण्यास
आणि मग -
खरा अर्थ कळतोय
कैवल्याचं देणं असणाऱ्या
समाधिस्त माऊलीच्या मौनाचं..!
