आठवण बालपणीची
आठवण बालपणीची
1 min
123
बालपणी
एकटाच बसलेलो असताना
तू अचानकपणे पाठीमागे यायचीस
अन् "भौक" आवाज काढून
मला घाबरवायचीस
तेव्हा मी खूप चिडायचो
आणि जोराने ओरडून
तुझ्यामागून धावायचो;
तुला मारण्यासाठी
मला चिडलेला बघून
तू मात्र खळखळून हसायचीस,
आणि मी रडकुंडीला यायचो
आता मात्र,
एकटं बसलेलो असताना
कुणीच "भौक" आवाज करून
घाबरवत नाही...
पण
असं एकटं बसलेलो असताना
आजही अनेक भासांना
झेलतो मी काळजावर
नियमितपणे ..!
