आणि मोर मोठा झालाय..!
आणि मोर मोठा झालाय..!

1 min

199
ताला सुरात गाताना,
त्याला घास भरवताना
तिचा उमाळणारा पान्हा
मात्र केव्हाचाच आटून गेलाय....
आणि
फुललेला मोगराही
दृष्टी अधू झाल्याने
तिला दिसेनासा झालाय....
कारण काय तर -
केतकीच्या बनात
थुईथुई नाचणारा तिचा मोर
नाचतानाचता केव्हाचाच
कुठेतरी पसार झालाय....
आता तिला कळून चुकलेय
दिवसागणिक काळ सोकावलाय
आणि मोर मोठा झालाय...!