Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vinay Dandale

Tragedy Others

3  

Vinay Dandale

Tragedy Others

उसासे . . . !

उसासे . . . !

1 min
375


आठवतंय मला 

लहानपणी कुणाची अंत्ययात्रा 

दिसली की , 

कळवळून यायचं मला , 

आतल्या - आत खूप - खूप 

रडायचो मी 

ते माझं अजाणतेपण होतं

की , समजून जायचं मला 

कुणास ठावूक ....? 

पण आता मी प्रौढ झालोय 

तरीही मन . . . . अंतर्मन 

तेच आहे .

भावनाही तशाच आहेत . 

असं काही दिसलं की ,

अजूनही रडतो मी आत - आत 

मोठ्यांनी चारचौघात 

रडणं बरं नसतं ना म्हणून . 

एवढंच की , 

ओम शांती शांती म्हणत 

त्या दुःखावर पांघरूण

घालतोय 

आणि वर येणारे उसासे 

आत दाबून टाकतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy