रुसु नको अवंदा तरी
रुसु नको अवंदा तरी


गतवर्षी कारभाऱ्यांनी जीव दिला
सांग आम्ही कोणाकडे बघायचं?
उघड कपाळ घेऊन कष्ट करते रानोरानी
सांग कसं जगायचं?
रुसु नको पावसा अवंदा तरी
हात जोडूणी विनंती करते तुला !
लेकरा बाळासाठी जगते आता
सांग कसं मरायचं?
अवंदा करावं म्हणतं लग्न लेकीच
सांग कसं करायचं?
रुसु नको पावसा अवंदा तरी
हात जोडूणी विनंती करते तुला !
हिमतीनं जगते आता
दुःख सारं गिळायचं
जीव मुठीत घेऊन जगते आता
सांग मी ही काय मरायचं?
रुसु नको पावसा अवंदा तरी
हात जोडूणी विनंती करते तुला !
दूनियांची पोट भरण्या आता
शिल्लक कोण राहायचं?
पदर पसरुनी भीक मागते तूला
सोड रुसवा आता तरी
रुसु नको पावसा अवंदा तरी
हात जोडूणी विनंती करते तुला !