आमचं कुठे चुकलं
आमचं कुठे चुकलं
आमचं कुठे चुकलं
म्हणून तू असं केलस
आम्ही शिकलो नाही
म्हणून तुम्हाला खूप शिकवलं
यात आमचं काय चुकलं
म्हणून तू असं केलसं
तुम्ही उपाशी राहू नये म्हणून
पोटाला चिमटा काढून तुम्हाला शिकवलं
आमचं कुठे चुकलं
म्हणून तू अस केलसं
तुला खुप शिकवल,मोठ केलं
यात आमचं काय चुकलं
देवाने दिलेल्या कन्यादानाच्या
भाग्यास आम्ही मुकलो
खरं सांग पोरी आम्हांला
आम्ही कुठे कमी पडलो
आमचं कुठे चुकलं
म्हणून तू असं केलसंं