तो आणि ती
तो आणि ती
कधी तो येतो आधी
नंतर येते ती
तर कधी ती येते आधी
नंतर येतो तो
असा हा पाठशिवणीचा
खेळ चालू असतो
पण या खेळाचा फटका
सर्व सजीवांना बसतो
त्याच्या आगमनाने
होतो सगळीकडे अंधकार
तर तिच्या आगमनाने होतो
अंधारात प्रकाशाचा चमत्कार
तो पडला तर होते सगळीकडे
जलयुक्त शिवार
ती पडली तर होते
क्षणार्धात राख
ती आणि तो कोण आहे
याची सगळ्यांना वाटे हौस
ती म्हणजे वीज
आणि तो म्हणजे पाऊस