STORYMIRROR

Manjusha Sawarkar

Action

4  

Manjusha Sawarkar

Action

निदान तू तरी

निदान तू तरी

1 min
41.4K


हलाल होणार्‍या बोकडांच्या माना

भयकंपित मुक्या नजरांचा आक्रोश

आणि सुखेनैव गिर्‍हाईकांच्या जिभल्या

बाजूलाच भाजून उताणे पाडलेले कोंबड्यांचे कलेवर

चौकाचौकात उतरलेली उंबरठ्यातली सौदेबाज शोधक लज्जा

आणि वासनांध नजरेनं वळवळणारे तरणेबांड युथ

श्रमानी वाकलेलं रस्त्या रस्त्यावरचं जर्जर वार्धक्य

भिकारणीच्या खांद्यावर मिरवणारं कुण्या नामर्दाचं मातृत्व

अमावास्येच्या अंधाराची साक्ष देत मध्यरात्री

डान्सबार मध्ये लक्ष्मीपूजन करणारे आमचे घरंदाज

आम्हीच अकाली प्रौढ केलेलं आमचं शैशव

विश्वा, हा सूर्य सत्याचा, हा लाचार क्रूस

सिद्धार्था, तू एकदाच दुःख पाहून कळवळलास

,,,,,,,,, आणि बुद्ध झालास

आमच्यातला राम,,,? रहीम,,,,? येशू,,,,? वाहे गुरु,,?

कुणीच कसा कळवळत नाही रे 

बुद्धा,,,,,

अत्त दीप भवः चा अर्थ सांगायला 

निदान तू तरी एकदा ये,,,,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action