हुंडाबळी
हुंडाबळी
ज्या मातीत रुजली अंकुर , भरली पानं देठासहित ते तिचं नसत
जिथं जन्मली तिथं लेक म्हणजे परकं धन समजलं जातं ..
नाव , गाव , सर्व काही बदलून जाते तिथं ती नव्याने रुजू पाहते तर
जिथं नांदायला जाते तिथं आम्ही तिला पोसतो असं म्हटलं जातं ?
तिची जमिनी कुठली ? तिनं रुजावं कुठल्या जमिनीत ?
स्त्री - पुरुष समानतेच्या गप्पा फोल ठरतात पावलापावलांवर...
ती कितीही शिकली , पुढारली तरी ती उपभोग्य वस्तूच ....
अधिकार तिचे नकळत हिरावले जातात जाणून बुजून ...
भलेही तिला देव्हाऱ्यात बसवून तिची पूजा बांधली जात असेल
पण तिचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला जातोच आजही ...
कायद्याला धाब्यावर बसवून तिचा बाजार मांडला जातोच ना
हुंड्यापायी तिला जिवंत जाळलं जातं , नराधमही तो सुटतोच ना ?
कुणी म्हणतं आम
्ही मुलाच्या शिक्षणाचा खर्च म्हणून हुंडा घेतो
मग हल्ली मुलगीही शिकते? तिचा खर्च कुणी देतो?
हुंडा म्हणजे समाजाला लागलेली कीड , त्यावर कुणी सहसा बोलत नाही ,
इथे असतो घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न , प्रेस्टिजचा वृथा अभिमान
हुंडा व्यवहाराच्या उलट कायदा ,वरपक्षाचा फायदाच - फायदा
इच्छा असो या नसो मात्र वधूपक्षाचा मात्र हकनाक जीव जातो
जोवर वधू हुंडा घेणाऱ्याशी लग्न न करण्याची शपथ घेत नाही ...
तोपर्यंत हुंडा देने - घेणे असेच चालू राहणार ..पुढेही .....
सगळं कळत पण स्वार्थपायी सगळे गप्प - गुमान बसतात
म्हणून तर पिढयानपिढया वधूपक्ष नागवला जातोय आणि
वरपक्षाचा तोरा कायम टिकून आहे , आता मुलींनीच पेटून उठायला हवं ..
हुंड्यापायी छळणाऱ्या नराधमांना वठणीवर आणायला हवं , क्रांतीज्योती बनून ..