मेघ
मेघ
कधीकधी असं वाटतं मेघ होऊन बरसावं
आसुसलेल्या डोळ्यांना कायमचंच हसवावं
किती किती जीव जाणार किती किती आत्महत्या होणार
अनुदानाच्या नावाखाली अजून किती पोटं भरणार
कर्जमाफीच्या ओझ्याखाली कष्ट करणारेच मरणार
पाण्याच्या एका थेंबासाठी सांगा किती तरसावं
कधीकधी असं वाटतं मेघ होऊन बरसावं
आसुसलेल्या डोळ्यांना कायमचंच हसवावं..
पुरे झाले अनुदान तुमचे पुऱ्या झाल्या खोट्या शपथा
भ्रष्टाचारी झालेत सगळे गातात कर्जमाफीच्या गाथा
काळ्या आईच्या हक्कासाठी अजून किती झीझावं
हातावरच्या पोटाला साहेब उपाशी कसं जगवावं
कधीकधी असं वाटतं मेघ होऊन बरसावं..
आसुसलेल्या डोळ्यांना कायमचंच हसवावं
बसं झालं रडणं आता बसं झालं मरणं
बस झालं आपल्याच आयुष्याला कंटाळून हरणं
उगाच कुणाच्या भरवश्यावर आयुष्य का जगावं?
अंगामध्ये बळ घेऊन ताठ मानेने लढावं..
स्वतःच आता मेघ बनून जोरजोरात गर्जावं
असुलेल्या डोळ्यांना आता आपणच हसवावं
असुलेल्या डोळ्यांना आता आपणच हसवावं...