शिवबा
शिवबा


आई होती जिजाऊ,
पिता शहाजीराजे,
शिवनेरी जन्मले होते,
शिवाजीराजे माझे
शत्रू होते सज्ज,
लुटले त्यांनी राज्य,
पण करूनी गणिमी कावा,
शिवबाने उभे केले स्वराज्य
अंगी होते बालपण,
पण डोक्यात शहाणपण,
करुनी शंभूशी नमन,
घेतली स्वराज्याची आण
वय वर्ष होते सोळा,
करूनी मावळे गोळा,
उडवुनी शत्रुंचा धुराळा,
प्रथम केला तोरण्यावरी सोहळा
बादशहाच्या आग्रहापरी,
गेले त्याच्या दरबारी,
अपमान होता क्षणभरी,
दिल्या त्याच्याही हातावर तूरी
खान एक स्वतःला समजे धीट,
राहिला लाल किल्ली थेट,
5, 0);">गमवून हाताची तीन बोट,
रात्रीच वाट धरली त्याने परतीची निट
उचलोनी पैजेचा विडा,
अफझलखानाने दिला वेढा,
शिकविला त्यास शिवबाने ऐेसा धडा,
साक्ष देती अजूनही प्रतापगडच्या कडा
आली मंदीची जेव्हा लाट,
तेव्हा धरली सुरतेची वाट,
सोन हिरे माणिकांची भरूनी मोट,
आणली स्वराज्यात थेट
शत्रूला कठोर शिक्षा,
पण भिक्षूकाला दिली भिक्षा,
करून आई बहिणींचा सन्मान,
किर्ती वाढवली चार दिशा
कृष्णा सारखे होते ज्ञान,
केले अर्जुना समान शत्रुंचे शिरसंधान,
शौर्या पुढे शिवरांयाच्या शेवटी,
शत्रुनेही झुकवली मान
𝕯𝕾