अधुरी कहानी
अधुरी कहानी
धडधडले हृदय माझे,
काळीज खोलवर फाटले,
ऐकुन नकार तिचा,
आश्रु नयनी दाटले.
भयाण पसरली शांतता,
घड्याळाचे थांबले काटे,
विश्वासाच्या चिंधड्या उडाल्या,
प्रेमाला फुटले फाटे.
मुसमुसुन रडलो स्वताशी,
आश्रु झाले अनावर,
राधेचा शाम दिसला,
आलो तेव्हा भानावर.
दृष्टी टाकुन मजवरती,
गाली तो हसला,
म्हणे मजसमान तुझाही,
प्रेमाचा डाव फसला.
तोडुन माझे प्रेम देवा,
आत
ा का मजवरती हसे?
बघवले नाही का प्रेम माझे,
टाकलेस उलटे फासे.
रडु नकोस असा,
अगळीक नारीच्या अदा,
शेवटपर्यंत साथ देईल,
अशी नाहीच कोणती राधा.
ऐकुन घेता बोल ते,
काळीज माझे तुटत होते,
प्राण पाखरू घायाळ ते,
आक्रदुंन फडकडत होते.
संपली होती भातुकली,
दुरावली राजा राणी,
खऱ्या माझ्या प्रेमाची,
अधुरी राहिली कहानी.
𝕯𝕾