बाळ माझ निजलेलं
बाळ माझ निजलेलं
1 min
167
साद घालितात पक्षी,
सडा घालितसे आई,
सळसळ करितसे परसात अंबराई,
बाळ माझ निजलेलं जाग कशी त्याला नाही?
पहाटेचा तो सुगंध बघ परिजातकाची नवलाई,
गोठ्यात वासराला चाटितसे गायी,
अनमोल ती प्रित किती सुंदर ती आई,
बाळ माझं निजलेलं जाग त्याला कशी नाही?
सरसर पावसाची बघ माळराणावरी,
दवबिंदूचे ते हसणे गुलाबाच्या पानावरी,
हवेचा हा झोत गातो का गं अंगाई,
बाळ माझं निजलेलं जाग त्याला कशी नाही?
सुर्यकिरणे डोकावती बघ क्षितीजावरी,
घंटा वाजे मंदिराचा बोलवते पायरी,
पाखरे चालली दुर चारापाण्याची ती घाई,
बाळ माझं निजलेलं जाग त्याला कशी नाही?
