कळत नाही मला
कळत नाही मला
कळत नाही मला तुझ्यात असे काय आहे येडु,
आठवण तुझी येता लागे हृदय माझे धडधडु.
दिवस असो वा रात्र फक्त तुझाच होतो भास,
सगळेच आहे आयुष्यात पण तु मात्र खास.
जवळ नाहीस तु तरी घट्ट किती हे बंध,
जसा फुलासोबत असतो त्याचा परिमळ गंध.
मन माझे तल्लीन होते तुझ्या आठवणींच्या स्वरांवर,
प्रेमवेल ती खुलु लागते हृदयातील कोमल स्तरांवर.
रुसतेस जेव्हा माझ्यावर वाटते खुप खंत,
भासते मला जणु काही जीवनाचा झाला अंत.
सोबतीने सोडवु दोघे एकमेकांच्या जीवनातील बाधा,
प्रेम करू असे काही जसे कृष्ण आणि राधा.

