तु आणि मी
तु आणि मी
तु शीत मी उष्ण,
तु राधा मी कृष्ण
तु चेंडू मी फळी,
तु फुल मी कळी
तु दिवस मी रात,
तु वरण मी भात
तु पाऊस मी वारा,
तु जल मी धारा
तु पतंग मी दोर,
तु आवाज मी शोर
तु जीत मी हार,
तु तलवार मी धार
तु घोडा मी सवार,
तु मोती मी हार
तु कुंडी मी रोप,
तु स्वप्न मी झोप
तु नाग मी फनी,
तु माळ मी मनी
तु माती मी कण,
तु वेळ मी क्षण

