निर्मळ प्रेम
निर्मळ प्रेम
निळसर आकाशाची झालर
नि गडद काळोखाची धार
एकटीच चांदणी का असते
चंद्राच्या लाडाची फार ?
तिला ते कळत नसतं
कुणीतरी तिला जिवापाड जपतं
तिची नजर लुकलुकताना
तिला दुराव्याचं दुःख सलतं
तिला वाटत एवढ्या सार्या चांदण्या
सगळ्याच चंद्राच्या दिवाण्या
इतक्या जवळ असूनही
तिचं प्रेम का अस लपतं ?
&nb
sp; चंद्र लपाछपी खेळतो
तिलाच तो चकवत असतो
तिला वाटतं कृष्णासारखं.....
सार्या गोपींवरच याचं
अपार प्रेम असतं
वेळ येते रजनी समयाला
निळसर आकाशात
काळोखाच्या धारेत
त्यांचचं दोघांच अस्तित्व फुलत असतं..
कारण ,निर्मळ ते प्रेम चंद्राच
एकाच चांदनीवर असीम असतं...!!!