स्पर्श गुज
स्पर्श गुज
सांग तो स्पर्श गुज तुला
कानी काय सांगून गेला ,
ऐकताच का गाली लाज
गुलाबी खुलवून गेला
होता जरी मंद शहरा ,
काय वेडा खोटा बहाणा
मुक्या शब्दांचा साज
कळी ओठांवर सजवून गेला
अंधारातला किर्र रातकिडा
का शांत वारा वादळ ताफा ,
बेधुंद मंद गंध राती असा
का श्वास गंधाळून गेला
घायाळ काळजावरी तुझ्या
का प्रेमवेडे रेघोटे ओढून गेला
काळजावर जखम रेघोटी
तरी का न वेदना मनी उरी
काय अशी फुंकर मारून गेला
सांग तो स्पर्श गुज तुला
कानी काय सांगून गेला ,
ऐकताच का गाली लाज
गुलाबी खुलवून गेला