माझी कविता सांगते
माझी कविता सांगते
माझी कविता सांगते
व्यक्त करते भाव मनातले,
मुक्या भावनांना स्पर्श करत,
शब्दांना पूर्णत्वाला आणते,
माझी कविता सांगते
भाव सुगंधी पारिजात गुंफत,
मन गाभारा दे उजळून,
रेशीम बंध येतील जुळून,
माझी कविता सांगते,
नको रंगात रंगवू स्वप्न उमलते,
जाग येताच डोळा ते तुटते,
कैदी म्हणून शब्द का सोडावे तळमळते,
माझी कविता सांगते,
तू लिहिणाऱ्या प्रत्येक
त्या कोऱ्या कागदावर,
मीच तुला पुन्हा पुन्हा जन्म देते,
माझी कविता सांगते
कधी अश्रू कधी वेदना
कधी यातना कधी भावना,
कधी कल्पना कधी भ्रम
कधीकधी वास्तव, अनुभव कधी
ना जाणे किती शब्दांची नाती
मी तुला देते, पण
नियतीचा खेळ सारा
नशीबाचा रेखीव पसारा
