तुझं येणं....
तुझं येणं....


तू येतो म्हणतोस आणि येतच नाही,
तुझं हे आता नेहमीचेच बाकी काही नाही,
तुझी वाट पाहण्यात क्षणाचे दिवस होताय,
दिवस मोजण्यात पहाटेची सांज होतेय,
तू काही बोललाच नाही मात्र कटाक्ष मी समजले,
शब्दांची गरज काय, डोळ्यांत स्वप्न भिजले,
का कधी केव्हा येण्याचं मी काय विचारलेच नाही,
कदाचित मी समजलेच होते की तुझं येणं नाही,
एक एक क्षण क्षणाचा दिवस , दिवसाचे साल,
अश्या आठवणी जपून आहेत आजही अजुनही,
आलास कधी परतीच्या वाटेवर चालत,
सैर करविन तुलाआठवणीच्या समुद्रात ,
कळेल तुला मग तू गेल्यानंतरच तुफान,
आठवणींच्या लाटा हिंदोळ्यावर झुलणारे मन
कळेल तुला कधी तरी माझ्या प्रेमाची किंमत,
कळेल तुला की खरं प्रेम पुन्हा नाही मिळत
पण तेव्हा मात्र मी नसेल ,
ना अपेक्षित तुला तुझी माफी असेल,
कदाचित खरंच काही जाणत्या चुकांची माफी नसते