STORYMIRROR

Dipaali Pralhad

Romance Others

3  

Dipaali Pralhad

Romance Others

तुझी माझी पहीली भेट,

तुझी माझी पहीली भेट,

1 min
458

अजुनही आठवते ती ,

तुझी माझी पहीली भेट,

काही क्षणांची का होईना , 

मनाची मनाशी जुळली होती घट्ट गाठ , 


नजरेला तुझ्या नजर दिली होती , 

तेव्हाच कळली होती,

तु दिलेली पापण्यांची साथ  , 


नव्यानेच जाणवली होती 

स्पंदन माझ्या ह्रदयाची , 

भुरळ होती तुझ्या साथ  दिलेल्या लवलवत्या पापण्यांची , 


आजची भेट जरी होती वर्षांनंतरची , 


पहीलीच भेट जणु डोळ्यातल्या त्या कमळांची , 

नजर तुझी सांगत होती उघड झाप ती पाकळ्यांची , 


अनोखी भाषा ती प्रितीची , 

जुन्या त्या प्रेमाच्या रितीची , 

आता श्वासांनाही जाणीव झालेली ,

अनाहत त्या मुक्या भावनांची , 


नजर तुझीही हटत नव्हती ,जाण्याची वेळ झाली होती , 

नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची 

नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance