मी गेल्यावर
मी गेल्यावर


मी गेल्यावर
माझ्या आठवणींची
मनात भीती वाटेल तुला
मग नकोस वाटेल तुझंच तुला
मी गेल्यावर
नुसताच दिवस उजाडेल अन रात्र सरेल
मध्यान्ह तुझी तडपत निघेल
अन सांज हि मेणासारखी वितळेल
मी गेल्यावर
कसे जगावे तुला कळणारच नाही
रोज रोज त्या टांगत्या आरश्यात
पाहिल्याशिवाय तुला जमणार नाही
मी गेल्यावर
येतील अश्रू कोरडे विरत्या डोळ्यातून
सारखे भास होतील माझे तुलाच
तुझ्या कोरड्या उष्म श्वासातुन
मी गेल्यावर
तू असाच काहीसा जगशील
हजारो लाखोंच्या गर्दीत
तू एकटाच राहशील