प्रेमात तुझ्या ...........
प्रेमात तुझ्या ...........
मी चातक बनले प्रेमात तुझ्या
तू बेधुंद बरसावा दाटल्या मेघापरी
डोळ्यातले दाटते अश्रू ओघळणारे
मी डोळ्यातच कोरडे केले
तुझ्या ओठांवर हसू पाहण्यासाठी
माझं स्वप्नांचं घरटेही मी जाळत गेले
तुझ्या स्वप्नांना उजेड देण्यासाठी
तुझ्या दिलेल्या काटेरी रुसव्यांनीही
मन माझं रक्तात माखले
तुला गुलाबासारखे जपण्यासाठी
आता श्वासांचाही जीव गुदमरतो
आधी मी आधी मी म्हणत
शरीरातून बाहेर पडू म्हणतो
पण का कुणास ठाऊक ?
तो अजूनही काळाशी झगडतोय
तुझी वाट पाहण्यासाठी
शेवटचा पर्याय एकच तू दिलाय
आता अखेरचा निरोप मी घेणार
तू कायमचा परत येण्यासाठी
पुन्हा जागून तुझ्यावर मरण्यासाठी

