तू नसतोस जेव्हा
तू नसतोस जेव्हा


जेव्हा जेव्हा तू नसतोस,
एक निरव शांतता असते,
उघड्या डोळ्यातही काळोख दाटतो,
आणि मनाची आगतिकता असते,
काळजाचा आकांत आक्रोश असतो,
धडधडत्या श्र्वासांची तगमग असते
मग काय... तुझ्याविना नको असणारी मी
माझीच मला नको असते.
जेव्हा जेव्हा तू नसतोस,
एक निरव शांतता असते,
उघड्या डोळ्यातही काळोख दाटतो,
आणि मनाची आगतिकता असते,
काळजाचा आकांत आक्रोश असतो,
धडधडत्या श्र्वासांची तगमग असते
मग काय... तुझ्याविना नको असणारी मी
माझीच मला नको असते.