डोळे नकळत पाणावले
डोळे नकळत पाणावले
तिची आठवण येता डोळे न कळत पाणावले
तिचा तो स्पर्श आठवला कि वाटतं जणू स्वर्गसुख मिळाले
प्रेम आणि संस्कारांची नाळ तिच्या बरोबर बांधली
कितीही संकटं येऊ दे ती आमच्या बरोबर थांबली
तिच्या कोणत्याच कामाचा मोबदला तिला मिळत नाही
स्वतःसाठी काही केलं असा एक ही दिवस आला नाही
लेकरांच्या प्रत्येक चुकांना तिने हृदयात सामावून घेतले
निःस्वार्थ प्रेमाची ही सीमा बघून डोळे नकळत पाणावले.
