अधुऱ्या प्रेमाच्या गोष्टीला तो क्षण पुरेसा होता.
अधुऱ्या प्रेमाच्या गोष्टीला तो क्षण पुरेसा होता.
त्या संध्याकाळी आम्ही न ठरवताच भेटलो
भेटीची ओढ एवढी होती की सर्व वीश्वच विसरलो
खळखळून वाहनारा तो समुद्र आज शांत होता
मावळत्या सुर्यनेही त्याचा लाल गुलाबी रंग छेडला होता
दगडावर आपटनाऱ्या लाटांचा आवाज कानात गुनगुनत होता
मध्यानंतरानंतर ही मावळता सुर्य जणू आम्हालाच पाहत होता
निशब्द त्या क्षणाला डोळ्यांनचा अबोला तुटला होता
हात त्याने हातात घेताच ह्यदयाचा ठोका चुकला होता
गढद होणाऱ्या अंधाराबरोबर वाराही बेभान झाला होता
कवेत त्याने ओढताच मला अंगावरू काटा शहारून आला होता
चंद्र ही जणू हसुन चांदण्यांचा वर्षाव करत होता
आमच्या अधुऱ्या प्रेमाच्या गोष्टीला तो क्षण पुरेसा होता..........

