STORYMIRROR

UMA PATIL

Romance

4  

UMA PATIL

Romance

वसंत

वसंत

1 min
28.1K


फुले वसंत फुलोरा

नटे निसर्ग रंगीत

चला गाऊ सर्वजण

खुशी, आनंदाचे गीत


जागे नवी प्रीत मनी

आला हा वसंतोत्सव

झाडे, पाने नि वेलींचा

जणू नवा जन्मोत्सव


रंग वसंताचे दिव्य

दिसे हिरवी ही सृष्टी

रंगारंग पसरला

मिळे तिला नवी दृष्टी


आली बघा धुळवड

खेळू चला प्रेमरंग

श्याम आणि राधा दोघे

रंग खेळण्यात दंग


कधी बेफिकीर राहू

कधी मस्तमौला जगू

रंग जीवनी या छान

नित्य खऱ्यानेच वागू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance