कळी ......
कळी ......
कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..!
क्षणां-क्षणाच्यां लाटावरं,
आयुष्य मात्र झुलतं जावे..!
अश्रु असो कोणाचेही,
आपणं विरघळुन जावे..!
नसो कोणीही आपले,
आपणं मात्र सर्वांचे व्हावे..!
छोट्या-छोट्या सुखासाठी,
आयुष्यं मात्र लोटतं जावे..!
प्रत्येक मार्ग अडचनीचा,
त्यावर खंबिरपणे चालत जावे..!
दुःखाच्या काट्यांना दूर लोटुन,
सुखाची फुले ही फुलवीत जावे..!
धरणी-नभाच्या प्रेमा सारखे,
आजन्मं मग जगतचं रहावे..!