STORYMIRROR

Varsha Bodh

Abstract

3  

Varsha Bodh

Abstract

पावसाचं-पाणी

पावसाचं-पाणी

1 min
27.1K


रिमझिमणाऱ्या पावसात

ओंजळीने घेतलंय पाणी

चोचीत चोचं घालुनीया

राघू-मैनेची ती गाणी


किलबिलाट पाखरांचा

ऐकूनी मग कानी

मोत्या-पवळ्यांची जोडी

भिरभिरते मग रानी


हिरव्या-हिरव्या रानी

पिवळ-पिवळ सोनं

रान पाखरांचा थवा

येती खाया पिवळ दाणं


आंब्यांच्या पारावर

पोरा-सोरांचा गलका

कुजबुजणाऱ्या बायकांचा

नळावर मग घोळका


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract