STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Abstract Inspirational

4  

Mahesh Raikhelkar

Abstract Inspirational

"सृष्टिचा -कोप"

"सृष्टिचा -कोप"

1 min
455

अगर गेल्यास तु माझ्या विरुद्ध

हरपुन टाकील मी तुझी शुद्ध

होवुन येईल मी भुकंप

प्रगतीला सुटेल तुझ्या कंप !


अगर केल्यास तु माझ्यावर मात

करील तुझा अध्याय मी समाप्त

येईल मी सुनामीच्या रूपाने

उध्वस्त करेल इमारती पत्ताच्या बंगल्याप्रमाणे !


अगर केल्यास तु मला उध्वस्त

नाही बसु देणार मी तुला स्वस्थ

दाखवीन पावसाचे रूप अक्राळ-विक्राळ

संपेल तुझ्या जीवनाचा कार्यकाळ !


अगर केलीस तु माझी हानी

नाही म्हणु शकणार तु आनंदाने गाणी

देईल तुला उन्हाचा असा तडाखा

उठेल तुझ्या अंगाचा पुरता भडका !


अगर पोहचवल्यास तु मला क्षती

होवुन जाईल तुझी कुंठीत मती

बरसेन कधी अवकाळी गारपीट

करेल तुझी-पिकाची ताटातूट !


अगर केल्यास तु माझे नुकसान

गळुन पडेल तुझे अवघे अवसान

थंडीने टाकेल मी असे गारठुन

रक्त जाईल तुझे पुर्ण गोठुन !


दिले मी तुला भर-भरून

जावु नकोस तु असा मातुन

केलास तु माझा सांभाळ

 सगळीकडे असेल सुकाळ !

सगळीकडे असेल सुकाळ !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract