STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Romance

3  

Mahesh Raikhelkar

Romance

गजल वृत्त : वियदगंगा...

गजल वृत्त : वियदगंगा...

1 min
1.3K

तुला मी सांगतो तू अप्सरा माझीच   आताही

तुझ्यासाठीच होतो जीव कासावीस आताही


मला जाणीव आहे आपल्या श्रीमंत  प्रेमाची

तुझा तो त्याग केलेला मला अनमोल  आताही

          

कितीदा वादळासंगे लढुनी प्रेम जिंकावे

तुला आणि मला त्या भावनेचे मोल आताही

        

कधी प्रेमात दोघे भांडलो लाडात त्या वेळी

मला आणि तुला त्या नाटकाची  ओढ आताही


तुला माहीत आहे मी तुझ्या साथीस केव्हाही

मला माहीत आहे तूच माझा जीव आताही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance