STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Others

3  

Mahesh Raikhelkar

Others

"माझे प्रेम "

"माझे प्रेम "

1 min
218

प्रेमात घातले मी स्वतःलाच कुंपण

नाही घेतले तिचे एकदाही चुंबन !


असतील समजून सगळ्यांच्याच आमच्यावर  नजरा

नाही माळला तिच्या वेणींत मी गजरा !


तिचा बाप सदाच आमच्या प्रेमाला नाडी

नाही घेतली तिला एकही साडी !


नोकरी साठी फिरे मी अनवाणी

नाही देवू शकलो तिला हॉटेलात मेजवानी !


मूल्य-संस्काराचे भूत सदाच माझ्या पाठी

नाही मारली तिला एकदाही मिठी !


 तिच्या घरासमोर बांधलं होतं भलंमोठं कुत्र

नाही पाठवलं तिला एकही प्रेमपत्र !


तिच्यासोबतच्या सुखी - संसाराची बांधली मी इमले

तिच्या नकाराने सारेच थांबले !

 तिच्या नकाराने सारेच थांबले !!



Rate this content
Log in