प्रेमाचे आर्जव
प्रेमाचे आर्जव
जे डोळ्यातून सांगतेस तेच ओठातून सांग
आतुर झालेत माझे ऐकायला कान
किती दिवस अशी अबोल राहणार
सांग मला अशी तू किती छळणार
प्रेमाचा वसंत ऋतू कधी येणार
माझ्या मनाची हुरहूर कधी संपणार
टाक माझ्या पदरात प्रेमाचे तू दान
बहरून येईल आपल्या प्रितीचे झाड छान
देऊ नकोस माझ्या मनाला एवढा तू ताण
गाऊ आपण दोघे प्रितीचे सुंदरगान
रात्रंदिवस तुझाच विचार माझ्या मनात
मला वाटे तू काही बोलली माझ्या कानात
कधी भेटणार तुझ्या सोबतचा मला एकांत
प्रेमाचे हितगुज केव्हा करणार आपण दोघे निवांत
मला वाटे आपण बनलो एकमेकांसाठी
त्याशिवाय पडल्या का आपल्या गाठी
न ठेवावे वेडे असे गुपित मनात
मी कोठे म्हणतो सांगावे ते चारचौघात
जाणून आहे मला तुझ्या काय आहे मनात
पण सांगावेच लागेल तुला ते मला शब्दात
जेव्हा तुझे शब्द उतरतील माझ्या हृदयात
तेव्हा आपल्या प्रेमाच्या अध्यायास होईल सुरुवात