येतील ते दिवस
येतील ते दिवस


येतील येतील तेही दिवस परत येतील
चार मित्र एका ताटात जेवतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
भजन किर्तनानी देवळे फ़ुलतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
हातावर टाळी देत मस्त गप्पा रंगतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
बच्चे मंडळी मनसोक्त मैदानात खेळतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
कोणी प्रेमी युगुल हातात हात घालून फ़िरतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
गाणी आणि कवितांच्या मैफ़िली रंगतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
हॉटेलात पक्वान्नांच्या मेजवाण्या झडतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
शाळा कॉलेज विद्यार्थांनी फुलून जातील
येतील येतील तेही दिवस परत येतील
मास्क, सॅनिटायझर या वस्तू इतिहासजमा होतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
सिनेमाघरे शिट्यांनी निनादून जातील
येतील येतील तेही दिवस परत येतील
सहलीचे बेत पुन्हा आखले जातील
येतील येतील तेही दिवस परत येतील
सणांवर संकटाची जळमटे नसतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
लग्न सोहळे बिनधास्त साजरे होतील
येतील येतील तेही दिवस परत येतील
दिवसा मागून दिवस मुक्तपणे जगता येतील!
मुक्तपणे जगता येतील!!