STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Romance Tragedy

4  

Mahesh Raikhelkar

Romance Tragedy

काही हायकू

काही हायकू

1 min
387

प्रेम करतेस

मग सांगत का नाही?

का अशी छळतेस?


बरे नव्हे असे वागणे

गुमान राहणे

स्वतःला छळणे



माहित आहे

तू आहेस माझ्या प्रेमात

पण पुरावा लागतो ना जनात



तुझ्यासाठी सोडले

मी घरदार

तू मानलीस हार



तुझे पैंजण

वाजे छुन छुन

मी गेलो हरपून



तुझ्या आणि माझ्यात

ना उरले अंतर

मृत्यू आला तरी बेहत्तर



तुझे अन माझे

मन जुळले

अंतर कसले



जे तुझ्या मनात

तेच माझ्या मनात

कशाला हवी भ्रांत?



तुझे अन माझे

बंध तुटले

छळणे उरले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance