STORYMIRROR

sourav shivsharan

Romance

4  

sourav shivsharan

Romance

मी फक्त!

मी फक्त!

1 min
42K


ती बसमधून यायची
अन् वर्गामध्येच जायची
ती वर्गातून यायची
अन् लॅब मध्येच जायची
ती लॅबमधून यायची
अन् बसमधून जायची
मी फक्त तिला
पाहतच राहायचो!

ती wapp वर यायची 
अन् मेसेज रिड करून जायची
ती फेसबुकवर यायची
अन् मला फक्त शेक करून जायची
ती Instagram वर यायची
अन् फोटो फक्त बघून जायची 
यामध्ये मी फक्त तिला
समजूनच घेत राहिलो!

ती कॉलेजला यायची
अन् लायब्ररी मध्ये जायची
ती लायब्ररी मधून यायची
अन् कँटीनलाच जायची
ती कॅन्टीन मधून यायची
अन् कॉलेजमधून माघारी जायची
यामध्ये मी फक्त तिला
पाहतच राहायचो!

ती भेटायला यायची
अन् मैत्रिणींच्या घोळक्यात जायची
ती घोळक्या मधून यायची
अन् सरांकडे शंका घेऊन जायची
ती शंकेचे निरसन करून यायची
अन् फक्त डोळ्यांच्या भेटीस यायची
यामध्ये मी फक्त तिला
पाहतच राहायचो!

ती स्वप्नात यायची
अन् भुरकन उडून जायची
ती हृदयात यायची
अन् काचेसारखी फुटून जायची
ती मनात भरायची
अन् दुसऱ्याची होऊन जायची
यामध्ये मी फक्त तिला
समजूनच घेत राहिलो!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance